जळगावांत प्रभाग क्र. २ मधील विकास कामांना प्रारंभ

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्थानिक नगरसेविका कांचन सोनवणे व आदिवासी वाल्मिकलव्य सेनेने प्रभाग क्र. २ मधील विकास कामे पावसाळ्यापूर्वी सुरु करावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महापौरांना निवेदनाद्वारे दिला होता. त्यांच्या मागणीची दखल घेऊन आज शनिवार दि. २ जुलै पासून महापालिकेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

 

प्रभाग क्र. २ मधील तानाजी मालुसरे नगर,पक्किचाळ,दीनकर नगर,कांचन नगर, पिंजारी वाडा झोपडपट्टी  शाळा क्र्. २१ परीसर, आसोदा रोड, या भागातील अम्रुत योजना ,नळ जोळणी ,भुयारी गटारीचे कामे,खडीकरण ,डांबरीकरण आदी कामे पावसाळ्यापूर्वी तात्काळ करून मिळावेत यासाठी नगरसेविका कांचनताई सोनवणे यांनी सतत पाठपुरावा करत होत्या, परंतू , त्यांच्या मागणीकडे महापालिका प्रशासन दूर्लक्षकरीत होते. म्हणून आदिवासी वाल्मिकलव्य सेने कडून दि.२० जून रोजी निवेदन महापौरांना देण्यात आले होते, कामे तात्काळ सुरु न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला होता. या निवेदनाची महापौर जयश्री महाजन , आयुक्त विद्या गायकवाड, जेष्ठ नगरसेवक नितीन लढा यांनी लगेच दखल घेऊन सदरचे कामे लगेच सुरु केलीत. सुरु झालेल्या कामाची पहाणी करतांना खालील पदाधिकारी व समाजसेवक हजर होते. नगरसेवक कांचनताई सोनवणे, आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव गुलाबराव बाविस्कर, जिल्हा अध्यक्ष योगेश बाविस्कर, जिल्हा सचिव दौलत माळी, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक बाविस्कर, शहर अध्यक्ष रोहीदास (बापु)ठाकरे, जिल्हा सदस्य डॉ. पंडीत बाविस्कर, समाजसेवक रवी पाटील, समाजसेवक राजेंद्र कोळी, गोपाळ मिस्त्री, समाजसेवक नारायण सपकाळे , श्रावण पेंटर आदी कार्यकर्ते हजर होते. महानगरपालीका प्रशासन कडून सुरु करण्यात आलेल्या कामा बद्धल प्रशासनाचे संघटने मार्फत आभार मानण्यात आले.

Protected Content