भुसावळ येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात लावली २०० जलपात्र

bhusawal chimani gharate

जागतील चिमणी दिनानिमित्त संस्कृती फाउंडेशन वतीने राबविला उपक्रम
भुसावळ प्रतिनिधी । संस्कृती फाउंडेशन ह्या निसर्गप्रेमी युवकांच्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पर्यावरण व पक्षी संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात ह्या वर्षी देखील असाच एक आगळा वेगळा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून जागतिक चिमणी दिनानिमित्त आयोजित करण्यात आला उन्हाळ्यात पाणवठे आटतात त्यामुळे उन्हाने व्याकुळ झालेले पक्षी आश्रयासाठी शहरातील उद्यानामध्ये येतात मात्र उद्यानात पक्षाच्या पाण्याची सुविधा नसल्याने पक्षाची तहान भागविण्यासाठी तसेच त्यांना क्षणभर विश्रांती साठी टाकाऊ वस्तूपासून घरटे व पक्षांना पिण्याच्या पाण्याचे जलपात्र उद्यानात लावण्यात आले आहे.

प्लास्टिक व टाकाऊ साहित्यापासून बनविले जलपात्र
उपक्रमात संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिकच्या पात्रांचा सुयोग्य वापर करून, उपयोगात नसलेल्या तुटलेल्या मटक्यापासून तसेच प्लास्टिक व टाकाऊ साहित्यापासून जलपात्र व वाळलेले गवत, लाकूड घरातील टाकाऊ वस्तू ह्यापासून घरटे बनविण्यात आले. सुमारे 200 जलपात्र व घरटे उद्यानात लावण्यात आले आहे ह्या जलपात्रामध्ये पाणी व खाद्य टाकण्याची जबाबदारी संस्थेच्या स्वयंसेवकांनी घेतली आहे. तसेच शहरातील नागरिकांनी उद्यानात आल्यानंतर तेथील जलपात्रामध्ये पाणी नसल्यास आपण त्यात पाणी भरून ठेवावे तसेच उद्यानात येतांना मुठभर धान्य ह्या पक्षांसाठी आणावे व उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता तहानेने व्याकुळ असेलेल्या पक्षांसाठी आपल्या घराच्या अवती भोवती जलपात्र ठेवावे असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून शहरवासीयांना करण्यात येत आहे.पुढील टप्यात येत्या रविवारी शहरातील विविध भागात असेल जलपात्र बसविण्यात येणार आहे.

उप्रकमात यांनी घेतला सहभाग
उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष रणजीसिंग राजपूत, तुषार गोसावी, अजित गायकवाड, अश्फाक तडवी, विनायक वाणी, अनिल जोशी, जितेंद्र चौधरी, पराग चौधरी, शुभम पाटील,कोमल बोरणारे, नम्रता चांडक, हर्षल येवले, हर्षवर्धन बाविस्कर, पवन कोळी, गीतिका कोरी, यामिनी महाजन, राहुल चौधरी, मंगेश भावे, राज बऱ्हाटे, निकिता पाचपांडे,मधूर भंगरदिवे, माधुरी विसपुते, अपर्णा चौधरी, लोकेशवरी कापडी, तेजस्वी पाटील, पल्लवी दमारे इत्यादी पक्षीमित्रानी परिश्रम घेतले.

संस्कृती फाउंडेशन ह्या निसर्गप्रेमी संस्थेच्या माध्यमातून सलग चौथ्या वर्षी हा उपक्रम शहरात राबविला जात आहे. उन्हाळ्यात पाण्याची टचाई जाणवते. जगलासह शेती शिवारात पाणी मिळत नाही. शेकडो पक्षांचा पाण्याअभावी मृत्यू होतो बरेच पक्षी शहर व गावाकडे स्थलांतर करतात. यातही मानवी वस्ती ऐवजी ते उद्यानामध्ये वसाहत त्यात करतात. यामुळे या ठिकाणी जलपात्र लावून त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा करून दिलेली आहेत. शहरवासियांनी उपक्रमात सहभाग घ्यावा.
– रणजितसिंग राजपूत (अध्यक्ष, संस्कृती फाउंडेशन)

Add Comment

Protected Content