यावल महाविद्यालयात कृषी मार्गदर्शन चर्चासत्र

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व यावल किसान प्रोडूसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बायो सी. एन. जी. गॅस उद्योग बाबतीत मार्गदर्शन व माहिती संदर्भातील चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयात आयोजीत या कृषी चर्चासत्रात यावल तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी बांधव, कृषी-लघुउद्योजक, सुशिक्षित तरुण-तरुणी या सर्वांना यावल किसान प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तसेच एम. सी. एल. कंपनी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बायो सी. एन. जी. प्रोजेक्ट म्हणजेच गॅस निर्मिती व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प निर्माण होत आहे ह्या बाबतीत दीपक पाटील यांनी उपस्थितांना सखोल व सविस्तर  मार्गदर्शन केले.

सदर महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मुकुंदा चौधरी, ज्योत्स्ना पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील व प्रा. एस. आर. गायकवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी, महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी आदी मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.

 

Protected Content