‘हेरगिरी’प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची जितेंद्र आव्हाड यांची मागणी

jitendra awhad

ठाणे (वृत्तसंस्था) इस्रायलच्या स्पायवेअर पिगाससाच्या माध्यमातून भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

 

आमदार जितेंद्र आव्हाड लवकरच राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार घेऊन याबाबतची मागणी करणार आहेत. हेरगिरीचे हे डिव्हाईस अत्यंत महागडे असून यासाठी खर्च कुणी केला सरकारने स्पष्ट करावे? अशी मागणीही आव्हाड यांनी केली आहे. अशा प्रकारची हेरगिरी करण्याची परवानगी कशी काय देण्यात आली?, असा सवाल देखील करत जितेंद्र आव्हाड यांनी अशी हेरगिरी कोणत्या कायद्यात बसते तेही सरकारने स्पष्ट करावे अशीही मागणी आव्हाड यांनी केली आहे.

Protected Content