भाजपचा एक गट घुसल्याने शेतकरी आंदोलन चिघळले — संजय राऊत

 

मुंबईः वृत्तसंस्था । दिल्लीतल्या आंदोलनात महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलेचाही मृत्यू झाल्यानं राज्यातही खळबळ उडालीय. संजय राऊत यांनी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक झाल्याचा गंभीर आरोप केलाय,

सरकारनं एक प्रकारची दडपशाही सुरू केलीय. लाल किल्ल्यावर जे शेतकरी घुसले, असं म्हणतायत. ते खरोखर शेतकरी होते का असा प्रश्न निर्माण होतोय. लाल किल्यावर शेतकरी नव्हते फूस लावून काही जणांना पाठवण्यात आले होते. ते आता कुठे फरार झाले आहेत, कुठे गायब झाले आहेत, त्याचा आधी तपास करावा, असंही संजय राऊत म्हणालेत.

जे आता फोटो आलेले आहेत, त्यात ते पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर आहेत. जे सिद्धू वगैरे लोक आहेत, ते कोण आहेत, कोणाचे आहेत. त्याचा तपास आधी करा. ते कुठे गायब झालेले आहेत, पण सरकारला यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचंय. दडपशाही करायची आहे. त्याचाच एक कारस्थानाचा भाग म्हणून आंदोलनामध्ये फूट पाडून त्यातील एक गट भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन घुसला होता, असा आरोपही संजय राऊत यांनी केलीय.

ते लाल किल्ल्यावर गेले होते. त्यांनी हडकम माजवला. आज आंदोलनात फूट पडल्याचं चित्र निर्माण करण्यात आलंय. काही नेत्यांवरती गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना बघून घेऊ, पाहून घेऊची भाषा पोलिसांकडून सुरू आहे. अधिवेशन सुरू होत आहे, पहिल्या दिवसापासून सरकारला या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील, असंही संजय राऊतांनी भाजपला ठणकावून सांगितलंय.

शिवसेना आपला अजेंडा राबवत असल्याची टीका होत आहे. शिवसेनेने आपला अजेंडा राबवला तर चुकलं कुठं? देशात सहा सात वर्षांपासून ज्यांची सत्ता आहे ते कुणाचा अजेंडा राबवत आहेत? कशा प्रकारे अजेंडा राबवत आहेत? नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या विकास कामांचं श्रेय कोण घेत आहे? आम्ही काय अजेंडा राबवावा हे आम्हाला कोणी सांगू नये, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र हिताचाच अजेंडा राबवत आहेत, असं राऊत म्हणाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जसे देशाचे होते, तसेच बाळासाहेब ठाकरे सुद्धा देशाचे होते. एखाद्या प्रकल्पाला त्यांचं नाव दिलं म्हणजे शिवसेनेने आपला अजेंडा राबवला असं होत नाही, असंही ते म्हणाले.

 

Protected Content