भाजपच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी जिजाबराव पाटील

धरणगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी जिजाबराव गिरीधर पाटील यांची नियुक्ती पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी केली आहे.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी धरणगाव तालुकाध्यक्षपदी जिजाबराव गिरीधर पाटील यांची नियुक्ती जाहीर केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे. आजवर आपण ज्या पध्दतीत काम केले त्याच प्रकारे तालुकाध्यक्ष म्हणून पक्ष वाढीसाठी आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा या नियुक्तीपत्रात व्यक्त करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

जिजाबराव गिरीधर पाटील यांच्या नियुक्तीबद्दल माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आ. चंदूलाल पटेल, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content