वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे वरणगाव सिव्हिल सोसायटी व वरणगाव पोलीस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन कोर्सेचे उद्या उद्घाटन करण्यात येणार आहे. अशी माहिती वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन घेण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागत आहे. यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागते. म्हणून वरणगाव सिव्हिल सोसायटी आणि वरणगाव पोलीस स्टेशनच्या विद्यमाने उद्या पासून स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते राहावे.
दरम्यान, यावेळी टॅलेंट विद्यार्थ्याची निवड करून त्यांना पुढील दोन महिन्यांमध्ये स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळा वरणगाव पोलीस ठाण्याच्या हॉल मध्ये संपन्न होणार आहे. तरी या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन कोर्सचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार बोरसे यांनी केले आहे.