पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिक्षणाच्या दर्जा उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या शहरातील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेत आ. किशोर पाटील यांच्या हस्ते भव्य अशा ग्रंथालयाच्या उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेत ग्रंथालयचे उद्घाटन आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मंचावर मौलाना अल्ताफ, मौलाना नईम रजा, मुफ्ती असरार, मौलाना आरिफ, मौलाना युनूस, मौलाना जैद उमरी, सलाउद्दीन सर, मा. नगरसेवक अय्युब अब्दुल रशीद बागवान, मुस्लिम बागवान, हाजी अबुल्लैस, शाफियोद्दीन मंसुरी, आकिब सर, महबुब मुतवल्ली सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेस आवश्यक असलेल्या सोयी सुविधांची पूर्तता व्हावी तसेच सदरची शाळा डिजिटल शाळा म्हणून नावारूपाला यावी अशा मागणीचे निवेदन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख जावेद शफी, मुख्याध्यापक अब्दुल एजाज अब्दुल रऊफ, पदवीधर शिक्षक शेख कादिर शब्बीर, शिक्षक शेख जावेद रहीम यांनी आ. किशोर पाटील यांना दिले.
याप्रसंगी शाळेत चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण केल्याने आ. किशोर पाटील यांनी शालेय व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शेख कादिर शेख शब्बीर यांनी केले.