दयाराम नगरातील व्यक्ती मृत्यूला कवटाळले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोल्हे हिल्स परिसरातील दयाराम नगरातील ४४ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत सोमवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरातील दयाराम नगर येथील महेश माणिकराव मराठे (वय-४४) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. सोमवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरात वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून महेश मराठे यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मराठे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content