कट्टरतावाद व जहाल राष्ट्रवाद कोरोना पेक्षाही जास्त घातक- अन्सारी

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात वाढीस चाललेला धार्मिक कट्टरतावाद आणि जहाल राष्ट्रवादी हा कोरोना पेक्षाही जास्त घातक असल्याचे वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले आहे.

भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देशात मागील वर्षांत जहालवादी विचारांना मोठ्या प्रमाणात चालना मिळत असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की देशात कोरोनापेक्षाही भयानक परिस्थिती होत आहे. ती म्हणजे धार्मिक कट्टरतावाद आणि जहालवादी राष्ट्रवाद या दोन्हीला देश बळी पडला आहे. सध्या देशाला सकारात्मक आणि सांस्कृतिक विचारांची गरज आहे.

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या द बॅटल ऑफ बेलॉन्गिंग या नवीन पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशन प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले की, मागच्या चार वर्षांच्या कालावधीत, भारत एक उदारमतवादी राष्ट्रवादाच्या मूलभूत दृष्टीकोनातून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नवीन राजकीय दृष्टीकडे आला आहे. यामुळे भारतीय जनतेच्या मनात धार्मीक कट्टरता आणि राष्ट्रवाद दृढ केला जात आहे.

Protected Content