गुलाबभाऊंची टोलेबाजी ! बीकेसी संकुलात धडाडली खान्देशची मुलूख मैदानी तोफ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज शिवसेनेच्या मास्टर सभेत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जोरदार भाषण करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. बीकेसीच्या मैदानावर खान्देशची मुलुख मैदानी तोफ धडाडल्याची प्रचिती यातून आली.

बीकेसीच्या संकुलात आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मास्टर सभा आयोजीत करण्यात आली असून याप्रसंगी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही प्रचंड सभा राज्यातील राजकारणात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले असून यात शिवसेनेच्या मोजक्या मान्यवर नेत्यांना भाषणाची संधी देण्यात आली आहे. यात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देखील भाषणाची संधी मिळाली. या सभेत भाषण करणारे ते ग्रामीण भागातील एकमेव नेते ठरले आहेत.

ना. गुलाबराव पाटील हे अमोघ वक्ते समजले जातात. आज देखील बीकेसीच्या संकुलातील सभेत याचीच प्रचिती आली. ते म्हणाले की, शिवसेना हा पक्ष वा संघटना नसून विचार आहे. सूर्य-चंद्र असेपर्यंत बाळासाहे ठाकरे यांचे विचार अमर राहतील. ते म्हणाले की, आम्ही जनहितासाठी अनेकदा कारागृहात गेलो आहोत. जो कारातगृहात जात नाही, तो शिवसैनिक नाहीच असे ते म्हणाले. लाईव्ह ट्रेंडस न्यूज विशेष वृत्तांत.

ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, सध्या सर्वसामान्यांसमोर अनेक समस्या आहेत. शेतकर्‍यांसह जनतेच्या समोर जगण्याच्या मोठ्या समस्या आहेत. मात्र यावर कुणीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र दुसर्‍याच विषयांवरून बोलून लक्ष विचलीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली. मांगकर नाही तर छिनकर घेण्याची तयारी शिवसैनिकांनी ठेवावी. अंगावर येणार त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिला.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुंबई-ठाण्याच्या बाहेरील भाषणाची परवानगी मिळालेले ना. गुलाबराव पाटील हे उर्वरित महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. आज देखील बीकेसीच्या सभेत ना. गुलाबराव पाटील यांना बोलण्याची संधी मिळाली असून त्यांनी तुफान टोलेबाजीने ही सभा गाजविल्याचे दिसून आले.

Protected Content