बुधगावचे विजय पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

चोपडा, प्रतिनिधी । तालुक्यातील बुधगाव येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी विजय शालीकराव पाटील (वाघ) यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी दिली आहे.

विजय पाटील हे आपल्या शेतीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. कापूस, गहू ,मका अशा पारंपरिक पिकांसोबतच फळशेती करण्यातही ते अग्रेसर असतात. आपल्या पिकांचे मार्केटिंग स्वतः आपणच करावे यासाठी त्यांनी आपल्या कृतीतून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा दिलेली आहे. कृषी क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे व प्रेरणादायी असल्याने संस्थेने त्यांच्या या कार्याची दखल घेत कृषिभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते बी. एन. पाटील, बुधगाव येथील ज्येष्ठ व प्रगतशील शेतकरी शालीकराव पाटील, चोपडा साखर कारखान्याचे माजी संचालक जितेंद्र पाटील, चोपडा नगर परिषदेतील विरोधी पक्ष गटनेते महेश पवार, ग्रामसेवक दीपक भामरे, प्रा. पंकज शिंदे तसेच बुधगावसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Protected Content