बामणोदवासीयांची पहाट होतेय श्री.स्वामिनारायणाच्या गजराने !

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बामणोद येथील श्री स्वामिनारायण सतसंग समाज यांच्यातर्फे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कार्तिकी दिंडीला सुरुवात झाली आहे. दररोज सकाळी 5.30 वाजता स्वामिनारायण मंदिरात आरती करून या दिंडीला सुरुवात करण्यात येते.

श्री स्वामिनारायण सतसंग समाजतर्फे दररोज सकाळी गावातून हरिनामाचा गजर करत गावातील सहभागी भाविक-भक्त पूर्ण गावाची फेरी पूर्ण करून परत श्री स्वामिनारायण मंदिरयेथे समारोप करतात. महिनाभर चालणाऱ्या कार्तिकी दिंडीचे गावातील सुवासिनींकडून सडा टाकून, रांगोळी काढून व दिवे लावून स्वागत करत असतात. त्यामुळे बामणोद वासीयांची पहाट ही चैतन्यमय होत आहे. तसेच, गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही प्रथा श्री.स्वामिनारायण मंदिर व समस्त सतसंग समाज जपत आहे.

Protected Content