रेल्वेने जिना उघडला; शिवाजीनगर वासियांना समाधान (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना बंदी लागू झाल्यापासून रेल्वेस्थानकातील जिना रेल्वेने सामान्य नागरिकांच्या वापरासाठ बंद केला होता. तो आता पूर्ववत सुरु झाल्याने शिवाजीनगरातील रहिवाशांसह कानळदा आव्हान भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांचीही मोठी गैरसोय दूर झाली आहे.

रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडे विस्तारलेल्या शिवाजीनगरातील रहिवाशांना या जिन्याचा सध्या मुख्य आधार आहे कारण जिल्हा परिषदेजवळ उड्डाणपुलाच्या कामामुळे मुख्य रास्ता बंद आहे. वाहतूक वळसा घालून सुरु असली तरी पायी जाणारांना हा जिना अत्यंत जवळचा मार्ग आहे. शहरात जाताना – येताना मोठा फेरा वाचला आहे वृध्द , अपंगांना दिलासा मिळाला आहे. शिवाजीनगरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे व जिल्हाधिकाऱ्यांकडे हा जिना सामान्यासाठी खुला करण्याच्या मागणीचा पाठपुरावा केला होता.

कोरोना प्रसार रोखण्यासाठी दक्षतेचा भाग म्हणून हा जिना बंद केलेला होता. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी जळगाव शहरात राहणारे नसल्याने त्यांच्या पातळीवर लोकांच्या मागणीच्या अपेक्षेप्रमाणे हालचाली वेगात होत नव्हत्या. त्यामुळे हा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यावर त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठवून निर्णय घेण्याची सूचना केली होती. स्थानिक आमदार आणि खासदारांनाही यासाठी प्रशासनाला सूचना केल्या होत्या.

स्थानिक रहिवाशांना किरकोळ कामे आणि खरेदीसाठी आता शहरात सहज जाणे येणे शक्य होणार आहे , पायी चालू शकणाऱ्या रुग्णांना शहरातील डॉक्टरांकडे जाण्याची सोय होणार आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/376834380248712/

Protected Content