जळगाव, प्रतिनिधी | लोक संघर्ष मोर्चातर्फे शहरातील पिंप्राळा परिसरात रविवारी पाच शाखांचे उद्घाटन करण्यात आले. लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने शहरातील रेशन ,रोजगार, रस्ते, पाणी व महिलांवर होणारे अत्याचार याविरोधात एल्गार उभा करावा म्हणून या शाखा सुरु करण्यात आल्या आहेत.
त्याच बरोबर आपल्या परिसरातील प्रश्न सोडवताना आपल्याला सर्व शासकीय जीआर ,कायदे याचे ज्ञान असेल पाहिजे, म्हणून लोकसंघर्ष मोर्चा सदर शाखांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे दर १५ दिवसांनी प्रशिक्षणही घेणार आहे. लोक संघर्ष मोर्चाच्या प्रत्येक शाखेतील सभासदांनी एकत्र येत आपल्यामधून अध्यक्ष ,सचिव व ११ सदस्यांची निवड केली आहे. संघटना कार्यक्रम म्हणून सर्वांनी आपल्या परिसरातील लोकांसोबत सर्व धर्माचा आदर राखत थोर विचारवंतांच्या जयंती महोत्सव व सार्वजनिक कार्यक्रम साजरे करण्याचा निर्धार केला आहे.
लोक संघर्ष मोर्चा शाखांच्या फलक अनावरणप्रसंगी मोर्चाच्या संस्थापक अध्यक्ष प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, लोक संघर्ष मोर्चा मागील २० वर्षा पासुन शोषित वंचित ,गरीब महिला यांच्या सोबत काम करीत असून जळगाव शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी ही सर्वांनी एकत्र येत काम करू यात शोषण व बेरोजगारी सारख्या प्रश्नांना आपण मिळून मार्ग काढू. यात आपल्या सर्व संघर्षात लोक संघर्ष मोर्चा आपल्या सोबत असेल.
शाखांचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विनोद देशमुख, सचिन धांडे, पिंप्राळा येथील माजी पोलीस पाटील विष्णु बाबा पाटील, विकास चौधरी, मुकुंद सपकाळे, अॅड्. विजय पाटील, नितीन राजपूत, राजेश पाटील, विजय देसाई, निकम मामा, प्रमोद पाटील, नंदू पाटील, दिलीप बोंडे, नंदुकुमार महेंद्र, जुबेर खाटीक, मिलीद सोनवणे ,दिलीप सपकाळे, शरिफा हे उपस्थित होते. ह्या वेळी स्थापन झालेल्या शाखांच्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक अध्यक्ष -हितेश कोष्टी, आझाद चौक अध्यक्ष नावेद शेख, ओम शांती नगर अध्यक्ष – अजय सोनवणे, साई मंदिर शाखा अध्यक्ष बबलू चौधरी, गुजराल पेट्रोल पंप अध्यक्ष नरेंद्र पवार आदी.