जामनेर तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या १३ शाखांचे उद्घाटन

जामनेर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या युवा जोडो संपर्क अभियानाच्या संकल्पनेतून जामनेर तालुक्यातील १३ गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखा उद्घाटन करण्यात आले.

त्या पुढीलप्रमाणे तोंडापूर गटातील वाकडी शेंगोळा ढालगाव ढाल शिंगी चिंचखेडा तवा हिवरखेडा तवा मांडवा बुद्रुक खांडवा मांडवा खुर्द तोंडापूर भारुड खेडा कुंभारी तांडा हरिनगर या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखांचे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, संजय गरुड, दिगंबर पाटील, वंदनाताई चौधरी, भगवान पाटील, दगडू पाटील, अशोक चौधरी, एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे, प्रमोद पाटील, जामनेर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, डॉक्टर बाजीराव पाटील, पुंडलिक पाटील, उद्योजक आबा  पाटील, माधव चव्हाण, स्वप्निल पाटील, अमोल ठोंबरे, सागर गरुड, किशोर खडपे, नाना माळी, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल पाटील, राहुल राजपूत जिल्हा सरचिटणीस सागर कुमावत किशोर खोडपे, माळपिंपरीचे सरपंच भगवान पाटील, सुरता जोशी, जिल्हा युवक उपाध्यक्ष मयूर उर्फ निलेश पाटील, व्ही जे एन टी सेलच जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, तोंडापूर माजी सरपंच सुनील कालबीले, जामनेर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष पप्पू पाटील, अकबर तडवी, संजय दांडगे, गजानन सोनवणे, संतोष कोळी, तळेगाव विकास पाटील, कासली कैलास अपार रतन पाटील, तालुका युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश पाटील, राजूभाई जेंटलमॅन सुभाष टेलर, नाना गोसावी, देवेंद्र गुजर, प्रदीप पाटील, तोंडापूर अशोक डेपोटी नेरी अमोल पाटील, तोंडापूर शहराध्यक्ष गोकुळ पाटील, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समन्वयक आबासाहेब पाटील, मानमोडी, सतीश पाटील बोदवळ, बोदवड तालुका कार्याध्यक्ष निलेश पाटील, तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटन व शाखा उद्घाटन साठी जामनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, जामनेर तालुका राष्ट्रवादी युवकचे तालुका समन्वयक अर्जुन पाटील, तोंडापूर गटप्रमुख गोपाल भोबे, तालुका सरचिटणीस गजानन पाटील, कार्याध्यक्ष दत्ता साबळे, आशिष दामोदर, सचिन पाटील, विकास दांडगे, एकनाथ जाधव आदींनी परिश्रम घेतले.

शाखा उद्घाटन समयी जामनेर तालुक्यातील तसेच जिल्ह्यावरील नेते मंडळींनी तालुका युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले व पुढील काळामध्ये संघटनेच्या ध्येय धोरणांना व तत्त्वांना सोबत घेऊन तालुक्यांमध्ये पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आव्हान देखील केले. शाखा उद्घाटन समयी शेंगोळा मांडवा बुद्रुक हिवरखेडा तवा चिंचखेडा तवा तोंडापूर वाकडी हरी नगर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मान्यवरांच्या साक्षीने प्रवेश केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content