यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच यवतमाळ जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. येथील नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्या कार्यशैलीला कंटाळून जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरेंसाठी एक झटका मानला जात आहे. या सर्वांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी अखेर शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.