Home Cities भडगाव नूतन लोनपिराचे वि.का.सोच्या चेअरमनपदी दीपक पाटील

नूतन लोनपिराचे वि.का.सोच्या चेअरमनपदी दीपक पाटील

0
107

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव येथे आज दि. १५ सप्टेंबर रोजी नूतन लोनपिराचे विविध कार्यकारी सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. नूतन लोन पिराचे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चार गाव मिळून बनलेली सोसायटी आहे. लोन, बोदर्डे, बोरनार, घुसर्डी एकूण 13 संचालकासह सोसायटीची निवडणूक होती. या निवडणुकीत बोदरडे येथील सीड फर्टीलायझरचे अध्यक्ष दीपक पाटील यांची चेअरमन पदी एकमताने निवड करण्यात आली तर घुसर्डी येथील विठ्ठल सोनजी पाटील यांचे वाईसचेअरमन पदी निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक अधिकारी भाऊसाहेब महाले व प्रेमसिंग पाटील हे उपस्थित होते. संचालक रायचंद परदेशी, भाऊसाहेब पाटील, भीमराव पाटील, प्रभाकर पाटील, वसंत पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रदीप पाटील, सोमनाथ पाटील, सुरेश खैरनार, सरस्वती पाटील, अरुणा पाटील व चारही गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी विजय पाटील, वामन पाटील, बापू पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश नानापाटील, शंकर पाटील, सागर पाटील, भिकन पाटील, अशोक परदेशी, शामकांत पाटील, उमेश पाटील, सचिव संजय पाटील व क्लार्क परशुराम पाटील आदी उपस्थित होते. चेअरमन दीपक पाटील यांचे सर्वांनी अभिनंदन केले.


Protected Content

Play sound