मुक्ताई कारखान्याला कर्ज देताना बँकेच्या लाभाचा विचार – आ.अनिल पाटील

anil patil

जळगाव, प्रतिनिधी | मुक्ताई साखर कारखान्याला कर्ज देताना आ. चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप नव्हे तर बँकेला त्यातून काय लाभ होणार, याचा विचार केला जाईल. असे स्पष्ट मत जिल्हा बँकेचे संचालक व अमळनेरचे आ.अनिल भाईदास पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते आज (दि.१०) जिल्हा बँक संचालकांच्या बैठकीसाठी येथे आले होते.

 

आ.पाटील पुढे म्हणाले की, मुक्ताईनगर साखर कारखाना हा खासगी कारखाना आहे. त्यामुळे त्याबद्दल कुणाचा आरोप किंवा कुणा व्यक्तीचा प्रभाव असा विचार न करता बँकेचे त्यात काय हित आहे, याचा विचार केला जाईल. अशाप्रकारे कर्ज देण्याआधी बँक प्रशासानाकडून अहवाल मागवला जाईल. त्यानुसार जर तो व्यवहार बँकेला लाभदायक असेल तरच कर्ज मंजूर केले जाईल. नाहीतर संचालक त्याला विरोध करतील.

माजीमंत्री खडसे हे बँकेच्या कामात हस्तक्षेप करीत नाहीत, आणि आम्ही त्यांना तसे करूही देणार नाही. असेही एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणारे कर्ज हे हेक्टरी २५ हजारावरून साडेबारा हजार करण्यात आल्याबद्दल त्यांनी मागील राज्य सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले. आजची जिल्हा बँक संचालकांची बैठक ही बँका व पीक विमा कंपन्या शासनाच्या परिपत्रकानुसार काम करतात का ? याबाबत विचार विनिमय करण्यासाठी असल्याचेही ते म्हणाले.

 

Protected Content