पाकिस्तानकडून गोळीबार : दोन जवान शहीद ; दोन जखमी

indian army afp 650x400 71475151560

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास गोळीबार केला असून या गोळीबारात दोन जवान शहीद झाले तर दोन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पुंछ जिल्ह्यातील गुलपूर सेक्टरमध्ये ही घटना घडली.

पाकिस्तानी सैनिकांनी गुलपूर सेक्टरमध्ये मोर्टारचा मारा केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले. आर्मी पोर्टरवर हे जवान काम करत होते. त्यावेळी पाकिस्तानने अचानक गोळीबार करत मोर्टार डागले. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय लष्कराने या गोळीबाराची पृष्टी केली आहे. पाकिस्तानच्या सैन्याने विनाकारण गोळीबार केल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

Protected Content