जेएनयू हिंसाचार प्रकरणी घोषसह दहा जणांवर गुन्हा

aishe ghosh

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करणाऱ्या काही गूंडांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या आइशी घोषसह दहा जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणी चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, योगेंद्र भारद्वाज, प्रिया रंजन, विकास पटेल, डोलन, आयशी घोषसह इतरांची नावे आहेत. मात्र, ‘मी कोणतीही चूक केलेली नाही. माझी चौकशी करायची असेल तर खुशाल करा, माझ्याकडेही माझ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे पुरावे आहेत, असे आइशी घोषने म्हटले आहे.

मागच्या रविवारी काही मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काही विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोष आणि इतर काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तेव्हापासून हा विषय देशाच्या राजकारणात पेटला आहे. या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. यावरुन सध्या राजकारणही चांगलेच पेटले आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरुन सत्ताधारी पक्षाला म्हणजे केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत ३ जानेवारी ते ५ जानेवारीपर्यंतचा घटनाक्रम देखील विशद केला. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही दाखवले. जॉय टिर्की डीसीपी क्राईम यांनी ही पत्रकार परिषद घेतली. आत्तापर्यंत हिंसाचार घडवणाऱ्या नऊ जणांची ओळख पटली आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केलेय.

Protected Content