मु.जे.महाविद्यालयात ‘महिला अत्याचार प्रतिबंध कायदे व स्त्री-पुरुष समानता’बाबत मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मु.जे. महाविद्यालयातील ‘लिंगभाव संवेदीकरण कृती योजना समिती व महिला अत्याचार प्रतिबंध समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, विद्यार्थ्यांना महिला अत्याचार प्रतिबंध कायदे व स्त्री-पुरुष समानता या विषयाची जाणीव व्हावी या उद्देशाने एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजेता सिंग यांचे ‘महिला अत्याचार प्रतिबंध कायदे व स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.

आधुनिक युगात महिला अत्याचाराचे स्वरूप आणि त्यासाठी भारतीय कायदे त्याची अमलबजावणी यांविषयी उदबोधक मार्गदर्शन डॉ. विजेता सिंग यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी केले. मू.जे. महाविद्यालयातील आय. क्यू . ए. सी. चे समन्वयक प्रो. केतन नारखेडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी, आपल्या अध्यक्षीय भाषणातून समाजात कुठल्याही सुधारणा व्हायला हव्यात असे वाटत असल्यास सुधारित बदलांची सुरुवात आपण आपल्यापासूनच करावी, असे प्रतिपादन केले.

तसेच, कार्यक्रमाकरिता ‘महिला अत्याचार प्रतिबंध’ समितीच्या अध्यक्ष प्रो. उज्ज्वला भिरूड व प्रा. डॉ. दिलवारसिंग वसावे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. गायत्री खडके यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. नम्रता महाजन यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रतिभा निकम यांनी केले. व्याख्यानानंतर विध्यार्थानी वक्त्यांना प्रश्न विचारून आपल्या शंकेचे निरसन करवून घेतले. एकंदरीतच, कायदे आणि हक्क ह्या विषयावर चर्चा उत्तमरित्या संपन्न झाली.

Protected Content