प्रमोद इंगळेंची प्रकृती खालावली; वंचित आघाडीचा आंदोलनाचा इशारा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । १४ सुरक्षा रक्षकांनी  खोटा आरोप केल्यावर तक्रार दिल्यानंतर त्यांना पाठिशी घालणारे उपकार्यकारी अभियंता यांच्यावरही कारवाई व्हावी म्हणून उपोषण करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद इंगळे यांची प्रकृती आज खालावली आहे. जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने त्यांची प्रकृती खालावल्यामुळे प्रशासनाची भूमीका अशीच दुर्लक्षाची राहिली तर वंचित बहुजन आघाडीकडून तिव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकूर यांनी दिला आहे.  

काय आहे प्रकरण !

प्रमोद इंगळे यांनी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, २० जानेवारी रोजीपासून माध्यम प्रकल्प मंडळात १४ सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या १४ सुरक्षा रक्षकांकडून प्रमोद इंगळे यांनी पैशांची मागणी करतो अशी खोटी तक्रार १४ सुरक्षा रक्षकांनी पाटबंधारे वाघुर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती. इंगळे यांना तक्रारीबाबत माहिती मिळाल्यानंतर, आपल्याविरूध्द तक्रार दिली असल्यामुळे संबंधित १४ सुरक्षा रक्षकांवर गुन्हे दाखल व्हावे यासाठी माहिती आधिकाराचा वापर करून सुरक्षा रक्षक कार्यरत असलेल्या जागेचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे यासाठी उपकार्यकारी अभियंता तथा जन माहिती अधिकारी सी.के.पाटील यांच्याकडे २३ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता. मात्र अद्यापपर्यंत माहिती जाणीवपुर्वक देण्यात आलेली नाही.

 

सीसीटीव्ही देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासावे १४ सुरक्षा रक्षकांनी केलेल्या तक्रारीत दोष असल्यास आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा १४ सुरक्षा रक्षकांना सेवामुक्त करण्यात यावे आणि जन माहिती अधिकारी तथा उप कार्यकारी अभियंता सी.के. पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहे. आज २१ मार्च रोजी त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाने उपोषणाची गंभीर दखल न घेतल्यास उद्या २२ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकूर यांनी माध्यमांशी बोलतांना दिला आहे.

jalgaon taluka news, jalgaon city news, jalgaon live news, jalgaon live, jalgaon news, jalgaon update news, jalgaon crime news, collector office, uposhan, jalgaon uposhan

https://www.facebook.com/508992935887325/videos/784248159186811

 

Protected Content