नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । आंध्र प्रदेशात या वर्षी लोकसभा निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणूका होणार आहे. या दोन्ही निवडणूकीसाठी भाजपच्या एनडीए आघाडीचा तिढा सुटला आहे. राज्यात विधानसभेच्या १७५ व लोकसभेच्या २५ जागा आहेत. अलीकडे आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष आणि दक्षिणात्य अभिनेते पवन कल्याण यांचा जनसेवा पक्ष यांनी एनडीएसोबत आघाडी केली आहे.
या विधानसभेच्या १० आणि लोकसभेच्या ५ जागांवर भाजप निवडणूक लढणार आहे तर जनसेवा पक्ष २१ विधानसभा आणि लोकसभेच्या २ जागा लढणार आहे. उर्वरीत विधानसभेच्या १४४ आणि लोकसभेच्या १७ जागांवर तेलूगू देसम पक्ष लढणार आहे.
आंध्र प्रदेशातील जागा वाटपाची बैठक दिल्लीमधील भाजप मुख्यालयात झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते. याव्यक्तिरिक्त भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित होते. दशकभरात पहिल्यांदा मोदी, नायडू आणि कल्याण एकाच मंचावर असणार आहेत