आ. सावकारेंच्या विशेष निधीतून साहित्याची खरेदी : तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला वितरण

भुसावळ, प्रतिनिधी । कोरोनासोबत लढतांना आरोग्य यंत्रणा सामुग्रीअभावी अपूर्ण होती. आमदार संजय सावकारे यांच्या विशेष निधीतून तब्बल ५० लाख रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. सोमवारी किन्ही आरोग्य केंद्रातून चारही आरोग्य केंद्राला या साहित्याचे वितरण करण्यात आले. यामुळे कोरोनासोबतच दोन हात करण्यासाठी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आता सज्ज झाली आहे.

भुसावळ तालुक्यातील प्राथमिक, ग्रामीण, नगरपालिका आरोग्यकेंद्रासाठी आमदार संजय सावकारे यांच्या विशेष निधीतून ५० लाखांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. सोमवारी किन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून तालुक्यातील चारही आरोग्य केंद्रासाठी या साहित्याचे वितरण करण्यात आले. यासाठी आरोग्य विभागाला कोरोनाच्या लढ्यात आवश्यक असलेले पीपीई किट, एन ९५ मास्क, हॅन्ड सॅनीटायझर, सर्जिकल मास्क आदींसह अन्य औषधी, साहित्यांची वाटप केले. मुबलक प्रमाणात औषधांचा साठाही उपलब्ध करुन घेण्यात आला आहे. तालुक्यातील चारही केंद्र, पालिका रुग्णालय व इतर शासकिय रुग्णालयांमध्ये वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, तालुका वैघकीय अधिकारी डॉ. संगीता पांढरे, किन्ही केंद्राचे डॉ. कल्पना दंवगे, डॉ. साजीया शेख, पिंपळगाव केंद्राचे औषध निर्माता मनोहर कोळी, किन्हीचे माजी उपसरपंच बंटी सोनवणे, माजी सरपंच अरुण चौधरी, सर्वोदय हायस्कुल चेअरमन सुरेश येवले, पंढरी बोंडे, दिलीप सुरवाडे, पोलिस पाटील राजू तायडे, संजय सुरवाडे, किरण घुले यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात भुसावळला प्राधान्य
जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम भुसावळ तालुक्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी शिफारस पत्र दिल्यामुळे या साहित्याची उपलब्धता लवकर झाली. जिल्ह्यात कोरोना निमुर्लनासाठी सर्वांत प्रथम भुसावळ तालुक्याला हि सामुग्री मिळाली आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोळे यांनी सांगितले.

यंत्रणेचे बळकटीकरण झाले
भुसावळ तालुक्यातील चारही आरोग्य केंद्रासाठी २० लाखांचे व दोन ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी २० लाख तर नगरपालिकेचे संत गाडगेबाबा रुग्णालयासाठी दहा लाख असे एकूण ५० लाख रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. अशी माहिती संजय सावकारे यांनी दिली. यामुळे भुसावळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरण होईल, असेही त्यांनी सांगितले.

Protected Content