रेल्वेत थेट नोकरी मिळण्याची संधी; भरती प्रक्रियेला सुरूवात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यात मेगा भरती सुरू झाल्याने इच्छुकांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तरूणांसाठी असल्याचे याबाबतची जाहीरात प्रसिध्दीपत्रक लवकरच प्रकाशित करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वे विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती ९१४४ पदांसाठी ही भरती होत आहे. ही तरूणांसाठी एक प्रकारची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तरूणांनी ही संधी चुकवू नये या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जातील. 8 मार्च 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली आहे.

फक्त वयाचीच अट नाही तर या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. ही भरती विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ८ एप्रिल २०२४ असेल.

Protected Content