स्थायी सभेत पुन्हा सदस्यांनी शहरातील अस्वच्छतेबाबत व्यक्त केली नाराजी

WhatsApp Image 2019 11 29 at 17.29.47

जळगाव, प्रतिनिधी | शहराची दैनदिन स्वच्छता व कचरा संकलनाचा मक्ता वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. या मक्तेदारासंदर्भात स्थायी सभेत नाराजी पहावयास मिळाली. ही सभा सभापती ऍड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त अजित मुठे, लेखा परीक्षक संतोष वाहुळे, उपायुक्त मिनिनाथ दंडवते, लेखा अधिकारी कपील पवार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

सभेत आरोग्य समिती सभापती तथा स्थायी सदस्य चेतन सनकत यांनी सफाईचा मुद्दा उपस्थित करत आरोग्य विभागाकडून त्यांना दिली जाणारी माहिती अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आला. यापूढे मक्तेदाराचे बिल कर्मचाऱ्यांचे किमान वेतननुसार वेतन अदा केल्याशिवाय देवू नये अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सभापतींनी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना चांगलेच धारेवर धरत सदस्यांनी मागितलेली एकतर वेळेत तुम्ही देत नाही, त्यात चुकीची माहिती व अपूर्ण माहिती देतात. तुम्हाला तुमच्याच विभागातील माहिती नाही का असे सुनावत त्यांच्या कामावर ताशेरे ओढले. तसेच यापुढे सदस्यांना त्वरीत माहिती देणे, समस्या त्वरीत सोडविण्याच्या सुचना सभापतींनी दिल्या. दरम्यान, कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी माती भरणे, प्रशासनाकडून मक्तेदाराल पाठीशी घालणे ते घंटागाड्यावरील कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याने त्यांनी आंदोलन करणे अशा सफाई मक्तेदाराच्या विविध मुद्यावरून सदस्यांनी आरोग्य विभागाच्या आधिकाऱ्यांना धारेवर धरले. भोईटेनगर रेल्वे गेटवर उड्डाणपूल प्रस्तावीत आहे. त्यात पिंप्राळा रस्त्याकडे जाण्यासाठी ८ मीटर पेक्षा रस्ता कमी असल्याने पुल उतरवीणे शक्‍य नसल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने महापालिकेला दिले आहे. त्यावर पर्याय म्हणून बोगदा करण्याचा प्रस्ताव महापालिकेने दिला आहे. हा प्रस्ताव स्थायी सभेत आज मांडला. यावर विष्णू भंगाळे, नवनाथ दारकुंडेनी हा मार्ग मर्यादीत असून शिवाजीनगर सारखी समस्या पुढे निर्माण होईल अशी सुचना मांडली. यावर स्थायी सभापतींनी पिंप्राळा रस्त्यावर पुल तयार करण्यास काय अडचणी आहे याची विचारली केली. यावेळी नगरचना विभागाचे अभियंता ईस्माईल शेख यांनी माहिती दिली. यावर सभापतींनी नगरचना विभागाने पून्हा या रस्त्यावर सिमाकंन करून, रेल्वेची भिंत आपल्या हद्दीत आहे का ? किती अतिक्रमण आहे ? ते काढता येईल का ? त्यानंतर पुल तयार करता येवू शकतो का ? असा अहवाल पुढील स्थायी सभेत द्यावा. तो पर्यंत हा प्रस्ताव हा तहकुब ठेवावा असे सांगितले. दरम्यान, हुडको कर्ज मुक्तीचा आढावा मांडत असतांना महापालिका खरोखर कर्जमुक्त झाली आहे का? असा प्रश्न शिवसेना सदस्य भंगाळेंनी उपस्थित केला. याला उत्तर देतांना भाजप नगसेवक सुनील खडके, सदाशिव ढेकळेंनी पलटवार करीत तुमची सत्ता असतांना कर्जबाजारी व खाते सिल झाल्याची नामुष्की ओढावली होती असे आरोप केले. यावेळी शिवसेना व भाजपा सदस्यांमध्ये चकमक उडाली. महापालिकेने साफसफाईच्या मक्तेदाराला ८५ नवीन घंटागाड्या दिल्या आहेत. साडेतीन महिन्यापासून या घंटागाड्यांची सर्विसींग झालेली नाही. मक्तेदार ठेका रद्द झाल्यास या गाड्या भंगार अवस्थेत होतील. त्यात दोन घंटागाड्यांचा अपघात झाला आहे त्याची काय स्थिती आहे अशी विचारणा सदस्य भंगाळेनी केली. यावर वाहन विभागाचे कर्मचारी श्री. लासुरेंनी इन्शुरसाठी मक्तेदरा कागदपत्र देत नसल्याचे सांगून वेळ मारून नेली. महापालिकेने प्लॅस्टीक पिशव्या कारवाई का थांबवली ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.. महिती उपायुक्तांनी घ्यावी. आता कर्मचाऱ्यांचे हप्ते सुरू झाले असून याची सोखल चौकशी करावी अशी मागणी बरडेंनी यावेळी केली. आतापर्यंत जप्त केलेले प्लॅस्टीक पिशव्या कुठे परस्पर विक्री झाली याची महिती उपायुक्तांनी घ्यावी. आता कर्मचाऱ्यांचे हप्ते सुरू झाले असून याची सोखल चौकशी करावी अशी मागणी बरडेंनी केली. यावर उपायुक्त दंडवते यांनी सविस्तर माहिती घेवून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिले. महापालिकेने साफसफाईच्या मक्तेदाराला ८५ नवीन घंटागाड्या पुरविल्या दिल्या आहे. साडेतीन महिन्यापासून या घंटागाड्यांची सर्विसींग झालेली नाही. मक्तेदार ठेका रद्द

Protected Content