खेतिया येथे नरेंद्र जैन यांनी केले २१ दिवसाचे उपवास

WhatsApp Image 2019 11 29 at 17.29.18

चोपडा, प्रतिनिधी | खेतिया येथील महावीर मशनरी अँड इलेक्ट्रिकलचे संचालक तरुण नरेंद्र जैन यांनी एकवीस उपवासाची तपस्या केली असून त्यांच्या पत्नी मोनाली तरुण जैन यांनी सात दिवस उपवासाची तपस्या केली.

जैन समाजातील खेतिया येथील श्री वर्धमान जैन संघाचे माजी अध्यक्ष नरेन्द्र जैन यांचे पुत्र तरुण जैन यांनी फक्त गरम पाण्यावर एकवीस दिवस तर त्यांच्या सुनबाई मोनाली जैन यांनी सात दिवसाचा उपवासाचे केले. खेतिया येथील श्री वर्धमान जैन भवनात उपवासाची सांगता करण्यात आली तेव्हा समरथगच्छाधिपती १००८ प.पू. श्री उत्तमचंदजी महाराज सा यांच्या शिष्या आज्ञानुवर्ती निमहासतीजी मधुर व्याख्यानी प.पू. शुभांगीनीजी महाराज सा यांच्या प्रेरणेने उपवास केले व तपस्या सुरू आहे. खेतिया येथील वर्धमान जैन संघाचे अध्यक्ष दिलीप पाबुदान संचेती, समरथ जैन श्रावक संघाचे अध्यक्ष शांतीलाल जैन यांच्या सह दोन्ही संघाच्या पदाधिकाऱ्याकडून उपवास व तपस्या करणाऱ्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

Protected Content