शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील नगरपंचायतकडून सृष्टी एंटरप्राइजेस गंगापूर या कंपनीला दैनंदिन साफसफाईचा ठेका दिलेला आहे. मात्र, दैनंदिन व्यवहारात स्वच्छतेच्या नावाखाली कंपनीकडून स्वच्छता कमी पण सत्ताधारी पदाधिकारी नगरसेवक व अधिकारी यांना दरमहा प्रत्येकी १० ते २० कमिशन देऊन पदाधिकारी पोसण्यासाठी उपयोग केला जात आहे, त्यामुळे प्रत्यक्षात नगरपंचायत तिजोरीवर दरमहा २ ते २.५० लाखाचा डल्ला मारला जात आहे. विशेष म्हणजे नगरसेवकांकडुन असे कमिशन गेल्या वीस महिन्यापासून मिळत असल्याची कबुली दिली जात असल्याने शेंदूर्णी नगरपंचायत मधील कमिशन खोरी हा गावांत चर्चेचा विषय बनला आहे.
जळगाव महानगर पालिकेतील बहुचर्चित वाटर ग्रेस कंपनी ठेक्यासारखेच प्रकरण शेंदूर्णी नगरपंचायत मध्ये सुरू आहे. येथिल दैनंदिन स्वच्छतेचा ठेका गेल्या २० महिन्यापासून गंगापूर येथील सृष्टी एंटरप्राइजेस या कंपनीला देण्यात आला असून स्वच्छतेच्या नावाखाली ही कंपनी महिन्याकाठी लाखो रुपयांचे बिल नगरपंचायत तिजोरीतून उकळत आहे येथील मुख्य रस्ते सोडता गल्ली बोळातील गटारी व स्त्यांची सफाई २-२ महिन्यापासून झालेली नाही त्यातच डासांच्या उत्पत्तीमुळे गावात तापाची साथ सुरू आहे परंतु नगरपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांना गाव स्वच्छतेशी देने घेणे नसून महिन्याकाठी मिळणाऱ्या ठराविक मलिदयासाठी सर्व चुप्पी साधून आहेत ठेका देण्यात आला.
तेव्हा दिवसातून दोन वेळेस संपूर्ण गाव स्वच्छता व दैनंदिन गटर सफाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते परंतु येथील अधिकारी व पदाधिकारी यांना स्वच्छतेचा ठेका घेतलेली कंपनी दैनंदिन स्वच्छता करीत आहे की नाही हे न पाहताच बिले अदा करून आपला ठराविक हिस्सा उकळत स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहे कँपनीविषयी मागील वर्षी अनेक तक्रारी केल्या जात होत्या तरीही पुन्हा त्याच कंपनीला ठेका देण्यात आला आहे नगरपंचायत हिता विरुद्ध अधिकारी पदाधिकारी वागत असल्याचे निदर्शनास येत आहे शेंदूर्णी नगरपंचायत हद्दीत किती किलोमीटर रस्ते व किती मिटर गटारी आहेत त्यांची नोंद नगरपंचायत कडे नाही तसेच दररोज किती टन कचरा निघतो व त्याचे मोजमाप कोणत्या प्लेट काट्यावर होते व बिले कशी अदा होतात हा गावकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे.
नगरपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांना महिन्याकाठी मिळणारी ठराविक रक्कम ही दोन ते अडीच लाख असल्याचे नगरसेवक सांगत असून गेल्या २० महिन्यात या ठेक्यातून नगरपंचायतला ५० लाखाचा चुना लावण्यात आला असल्याची चर्चा आहे त्यास सत्ताधारी नगरसेवक दुजोरा देत आहे तर वर्तमान पत्रातील बातम्या विषयी काही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला असता सत्ताधारी नेत्यांनी अश्या विषयाकडे लक्ष न देण्याचा सल्ला नगरसेवकांना दिला आहे.
इतरांना मिळणारी रक्कम आम्हाला का मिळत नाही म्हणून सत्ताधारी २ नगरसेवकांनी हा विषय आमदार गिरीश महाजन यांच्याकडे नेला होता पण आमदार गिरीश महाजन यांनीही स्थानिक नगरपंचायत कारभार पाहणाऱ्या नेत्यांनीच तळी उचलून धरल्यामुळे तक्रारकर्ते नगरसेवक नाराज झाले आहे मागील २० महिन्याचे आमच्या हीश्याचे सृष्टी एंटरप्राइजेस कडुन उकळलेले कमिशन नेत्यांनी हडप केल्याची त्यांचे म्हणणे आहे नाराजी दूर करण्यासाठी सत्ताधारी नेत्याने कमिशन वृद्धी करण्याचा सृष्टी एंटरप्राइजेस कडे आग्रह धरला होता त्यास कंपनीने नकार दिला म्हणून नगरपंचायतने कंपनीचे बिल थांबविले होते.
विशेष म्हणजे सत्ताधारी कमिशन विषयी चुप्पी साधून आहे तशीच चुप्पी अधिकारी पण साधून असल्याने गौडबंगाल काय आहे हा चर्चेचा विषय आहे