‘उगम फाऊंडेशन’तर्फे कुंझर येथे गरीब वस्तीसाठी जलकुंभ प्रदान

b6cfd788 7b78 4fd0 8e93 8bebc6d6446b

चाळीसगाव, प्रतिनिधी | डोंबिवली येथील तरुणाईने उगम फाऊंडेशनच्या माध्यमातून आज (दि.२१) तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेल्या कुंझर येथील इंदिरा नगर वस्तीसाठी जलकुंभ भेट देवून नवा आदर्श घडवला आहे. येथील आई फाऊंडेशनचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध स्त्रीरोग चिकित्सक डॉ.विनोद मुरलीधर कोतकर यांचे हस्ते आज या जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले.

 

या गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण आजपासून थांबणार असल्यामुळे उपस्थित माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.उगम फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत तांबे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेली ही तरुणाई उद्याच्या भारतासाठी एक आशेचा किरण असून या सर्वांनी गरजू लोकांसाठी स्वत:हून देवू केलेली ही मदत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार डॉ. कोतकर यांनी यावेळी काढले. कुंझर येथील भूमिपुत्र चंद्रशेखर शिसोदे यांनी फेसबुकच्या माध्यमातून उगम फाऊंडेशनच्या संपर्कात येवून गाववासियांसाठी या उपक्रमाचे आयोजन करुन तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल डॉ .कोतकर यांनी त्यांचेही विशेष कौतुक केले. कार्यक्रमप्रसंगी संकेत तांबे, केतन सावंत, वैभव ,प्रशांत निकम, सुधीर चव्हाण, राकेश कोतकर, अनमोल नानकर तसेच गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Protected Content