चिंचोली येथे टायगर गृपचे अध्यक्ष घुले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मास्कचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । टायगर गृपचे अध्यक्ष पैलवान अनिकेत घुले व अजय शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील चिंचोली येथे गरजूंना मोफत मास्कचे वाटप आज शनिवार १७ एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

अधिक माहिती अशी की, पुण्यातील टायगर गृपचे अध्यक्ष पैलवान अनिकते घुले व अजय शिरसाठ यांचा आज १७ एप्रिल रोजी वाढदिवसानिमित्ताने टायगर गृप भारतचे अध्यक्ष तानाजी जाधव, गौरव उमप, ग्रामपंचायत सदस्य आनंद घुगे, टायगर गृपचे सदस्य सोपान मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली येथे गरजू व्यक्तींना मास्कचे वाटप करण्यात आले.  यावेळी रवींद्र पाटील ,गणेश गोपाळ ,पवन कोळी ,प्रणव लाड ,विशाल शेळके, राहुल शेळके, शुभम कोळी ,विशाल पाटील ,रुपेश घुगे यांच्यासह टायगर ग्रुप सदस्य यांची उपस्थिती होती.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.