रावेर प्रतिनिधी । तालुक्यात काही शिक्षक पुढारीपणा करताय मुलांना ज्ञानदान देण्याचे कर्तव्य सोडुन शिक्षक दारू पियुन धिंगाना घालतात आणि तुम्हाला याबाबत काहीच माहिती नाही, असा प्रश्न करत पंचायत समिती सदस्य जितु पाटील, दिपक पाटील यांनी गटशिक्षणधिकारी एस.डी. दखणे यांची चांगलीच कानउघडनी करण्यात आली आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्या वरील खड्यामुळे रावेर पंचायत समितीची मासिक सभा चांगलीच गाजली. मागील आठवड्यात दोन जणांची खड्डे चुकवतांना अपघाती मृत्यु झाला होता. लवकरात लवकर पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आले. येथील पंचायत समितीमध्ये मासिक आढावा बैठक सभापती कविता कोळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उपसभापती धनश्री सावळे पंचायत समिती सदस्य माधुरी नेमाडे, अनिता चौधरी, जितेंद्र पाटील, जुम्मा तडवी, दिपक पाटील, योगेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते. सभेचे कामकाज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी पाहीले.
यांची होती उपस्थिती
यावेळी बैठकीला जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपमुख्य अधिकारी चंद्रशेखर चोपडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील, बांधकाम अभियंता पराग पाटील, डी. आर. महाजन सार्वजनिक बांधकामचे तायडे, श्री महाजन, विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे यांच्या सह सिंचन विभाग एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी उपस्थितीत होते.