डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन महाविद्यालयात बी.सी.ए चा इंडक्शन प्रोग्राम

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील विमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन जळगाव महाविद्यालयात बी.सी.ए प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होत.

 

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. निलीमा वारके यांनी गणपती व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. प्रास्ताविक प्राचार्या  डॉ. नीलिमा वारके  यांनी  केले.  यात त्यांनी  इंडक्शन प्रोग्राम घेण्यामागील  उद्देश स्पष्ट केला.  तसेच त्यांनी एस.एन.डी.टी विद्यापीठविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. आपले महाविद्यालय हे या विद्यापीठाशी संलग्नित असून या विद्यापीठांमधून नामांकित यशस्वी महिलांनी शिक्षण घेतले आहे.  कॉम्प्युटर  क्षेत्रात भविष्य घडवू  घेण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, वाचन, संभाषण कौशल्य यावर जास्त भर द्या.  येणाऱ्या तीन वर्षात जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करा व स्वतःमध्ये विशेषसद्गुण प्राप्त करा. दररोज इंग्लिश वृत्तपत्र वाचण्यावर जास्त भर द्या जेणेकरून संभाषण कौशल्य सुधारण्यास मदत होईल  असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, आजच्या युगात  वेगवेगळे सॉफ्टवेअर, मोबाईलच्या अँप यांचा दररोज वापर होत आहे. ज्ञान व सराव चांगला असेल तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. संगणक क्षेत्रात तुम्ही सुद्धा एक यशस्वी उद्योजक बनू शकतात. यावेळी त्यांनी जळगावच्या नेहा नारखेडे यांचे उदाहरण दिले.   यावेळी  प्रा. योगिता घोंगळे यांनी  महाविद्यलयाबद्दल माहिती देवून महाविद्यालयाच्या शिक्षकांची ओळख करून दिली.  यासोबत बी.सी.ए चा अभ्यासक्रम, परीक्षेची गुणप्रणाली, इत्यादी विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार  प्रा. श्रुतिका नेवे यांनी केले.यावेळी  बी.सी.ए.च्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची व पालकांची उपस्थिती  होती. या  कार्यक्रमास महाविद्यालयांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

Protected Content