युवासेना आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेत – साई मोरया ग्रुप विजयी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रातिनिधी | युवासेनेच्या १२ व्या वर्धापन दिवसानिमित्त युवासेना जळगावतर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोहाडी रोडवरील  यु.एस.टर्फ  येथे करण्यात आले होते. यास्पर्धेत साई मोरया ग्रुप हा संघ विजयी ठरला.

 

विधानसभा युवाधिकारी अमित जगताप व जळगाव लोकसभा कॉलेज कक्ष अधिकारी प्रितम शिंदे यांच्या पुढाकाराने सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० ते १०.३० वाजे दरम्यान बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत  ५ संघ सहभागी झाले होते. खोटेनगर येथील साई मोरया ग्रुप हा संघ विजयी ठरला. प्रत्येक संघात ८ खेळाडूंचा सहभाग होता. विजेत्या संघाचे कर्णधार उमाकांत जाधव यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पियुष हसवाल व उत्कृष्ट फलंदाज म्हणून गिरीश वंजारी यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, ज्येष्ठ विधितज्ज्ञ सत्यजित पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हा समन्वयक जितेंद्र बारी, लोकेश पाटील, भूषण सोनवणे, शुभम पुचा आदी उपस्थित होते.

Protected Content