पहूर येथील जि.प शाळेत माता-पालक सभा उत्साहात

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । येथील संतोषीमातानगर जि.प शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त माता-पालक सभा उत्साहात संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सदस्या तथा जि. प. सदस्या सौ. प्रमिलाताई पाटील, सरपंच सौ. निताताई पाटील, सौ. वंदनाताई सावळे, सौ. निर्गुणा महाजन उपस्थित होते.सुरूवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हळदी-कुंकू कार्यक्रम, ० ते १० वर्षा पर्यंतच्या मुलींसाठी सुकन्या समृध्दी योजना, विधवा मातांचा सत्कार, सन २०२०-२०२१ साठी पटनोंदणी जनजागृती, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करावयाचे प्रयत्न, महिलांना भेट वस्तू वाटप, गॅस बाबत घ्यावयाची काळजी या बाबत प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम घेण्यात आले.
जि.प. सदस्या सौ. प्रमिलाताई पाटील यांनी उपस्थित महिलांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणी लेक वाचवा – लेक शिकवा याविषयी कविता सादर केली. सरपंच सौ. पाटील यांनी सुकन्या समृध्दी योजना बाबत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे महत्त्व पटवून सांगितले. मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी सन. २०२०-२०२१ करीता पटनोंदणी, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करावयाचे प्रयत्न याबाबत माहिती सांगितली.

कार्यक्रम प्रसंगी विधवा मातांचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महिलांना हळदी-कुंकू कार्यक्रम करून त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे औचित्य साधून तिरुपती भारत गॅस एजन्सीचे संचालक तथा उत्तर महाराष्ट्र धनगर समाजाचे प्रमुख रामेश्‍वर पाटील यांनी गॅस बाबतीत घ्यावयाची काळजी या बाबत प्रात्यक्षिके करून दाखवून उपस्थित महिलांना त्यांच्या तर्फे लायटर वाटप करण्यात आले.

सूत्रसंचालन श्रीमती मनीषा राऊत यांनी केले व आभार श्रीमती रोहिणी शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. निर्गुणा महाजन, सदस्या सौ स्वाती आस्कर, अनिता कुमावत, माता – पालक लताबाई लहासे, ज्योती पाटील, भारती भिवसने, मनिषा कुमावत, आशा करवंदे, छाया पांढरे, प्रतिभा सोनवणे, यास्मीनबी शेख, दुर्गा बोरसे आदी माता-पालक बहुसंख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील उपशिक्षका श्रीमती चित्रलेखा राजपूत, श्रीमती रत्नमाला काथार, श्रीमती रोहिणी शिंदे तसेच शा.पो.आ. स्वयंपाकी व मदतनीस सौ. ललिता उबाळे, शैलजा सुरडकर यांनी परिश्रम घेतले.

वर्षा राऊत बनली एका दिवसाची मुख्याध्यापिका

डॉ हेडगेवार प्राथमिक विदयालयाचे मुख्याध्यापक अजय रामकृष्ण देशमूख यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळा आणि अभिनव उपक्रम राबवला. ज्यामध्ये डॉ हेडगेवार प्राथमिक विदयालयाची इ .३ री पहूर येथील ९ वर्षाची विद्यार्थीनी वर्षा राऊत ही एका दिवसाची डॉ.हेडगेवार प्राथमिक विदयालयाची मुख्याध्यापिका बनली.

सावित्रीबाई फुले व डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या प्रमिलाताई पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. स . सदस्या पूजा भडांगे, पहूर पेठ सरपंच सौ.निताताई पाटील, पहूर कसबे सरंपच ज्योती घोंगडे, वर्षा ठाकूर, संचालिका वंदना वानखेडे, सुषमा चव्हाण, निर्मला घोंगडे, माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे , व सेन्ट्रल रेल्वे बोर्डाचे सदस्य रामेश्‍वर पाटील उपस्थित होते. यावेळी महिलांच्या समस्या , सबलीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक मनोज खोडपे यांनी सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले. तर आभार हरीभाऊ राऊत यांनी मानले.

Protected Content