गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांना समजताच त्यांनी पोलिस कर्मचाऱ्‍यांना घटनास्थळी पाठवले आणि सापळा रचून मुद्देमालासह आरोपीस अटक केली.

अधिक माहिती अशी की,फिर्यादी पोकॉ जितेंद्र संतोष सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास एक इसम भुसावळ शहरातील गांधी पुतळ्या गांजा विक्री करणार असल्याची खात्रीदायक माहिती पोलीस निरीक्षक ठोंबे यांना मिळल्यावरून  घटनास्थळी सापळा साचून आरोप राकेश भीमराज नटकर वय ३० राहणार न्यू सातारा पूल, ओंकारेश्वर मंदिर भुसावळ जवळील असून यांच्या ताब्यातून २ किलो ओला गांजा २० हजार रुपये किंमतीचा रात्री २.१० वाजेच्या सुमारास स्कुल बॅगमध्ये त्यांच्या पाठीमागे बाळगतांना मुद्देमाल मिळून आला तसेच टेकनो कंपनीचा मोबाईल फोन व १३० रुपये रोख मिळून आले म्हणून शहर पोलीस स्टेशनला भाग-६  गुरुन ३१/२०२१ भादवि कलम एन.डी.पी.एस कायदा २०,२९ (गुंगीकारक औषधी द्रव्य मनु व्यापारावर परिणाम अंमली करणारे पदार्थ अधिनियम १९८५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोकॉ. जितेंद्र सोनवणे, संजय बडगुजर, भूषण चौधरी, पोहेकॉ साहिल तडवी अशांनी मिळून केली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विनोदकुमार गोसावी करीत आहे.

 

Protected Content