एरंडोल येथे मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई

एरंडोल प्रतिनिधी । कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता नगरपालिका आणि  पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. 

दि.२२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्या बरोबर एरंडोल पोलीस प्रशासन व नगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने मास्क न लावणाऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यात येत आहे.यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर पोलीस कर्मचारी व नगर पालिका कर्मचारी सकाळ पासून ते रात्री आठ वाजेपर्यंत उभे राहून कारवाई करीत आहेत. त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी लोक मास्क वापरतांना दिसत आहेत.गेल्या अनेक महिन्यांपासून लोक कोरोनाला विसरुन गेले होते व त्यामुळे त्यांनी मास्क वापरणे बंद केले होते.असेच प्रकार सगळीकडे सुरु होते. त्यामुळे पुन्हा कोरोना ने आपले डोकं वर काढलं. 

त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्तीचे केल्याने एरंडोल येथे सदर कारवाई सुरु करण्यात आली आहे. यासाठी पोलीस कर्मचारी विलास पाटील,संतोष चौधरी नगर पालिका कर्मचारी एस.आर.ठाकुर, विनोद पाटील, राहुल ठाकुर हे धरणगाव चौफुलीवर व बाकी कर्मचारी शहरातील प्रमुख मार्गांवर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करुन शहराला शिस्त लावण्याचे काम करीत आहेत.त्यासाठी नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले आहे.

 

Protected Content