भुसावळात अप्पर पोलिस अधीक्षकांच्या पथकांची कारवाई ; कल्याण सट्टा जुगार अड्ड्यावर छापा !

 

 

भुसावळ : प्रतिनिधी । शहरातील पाणीगेट जवळील रिक्षा स्टॉपच्या आडोशाला रिक्षांमध्ये कल्याण मटका नावाचा सट्टा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून गुरुवारी दुपारी अप्पर पोलिस अधीक्षकांच्या पथकांने जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली.

भुसावळ तालुक्याला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सट्टा जुगार अड्ड्यावर एकही कारवाई केली नसल्यामागचे रहस्य गुलदस्त्यातच आहे. भुसावळ शहरात स्थानिक गुन्हे शाखा पथक शहरात दाखल होऊन एकाच दिवशी पाच ठिकाणी कारवाई केली होती.पोलीस अधिकारी गप्प का बसले आहे.? बाहेर गावातील पथक शहरात दाखल होऊन कारवाई करीत आहे.

गुरुवारी अप्पर पोलीस अधीक्षकांचे पथक भुसावळ शहरात दाखल होऊन पाणीगेट जवळील रिक्षा स्टॉपच्या आडोशाला रिक्षांमध्ये आरोपी इजाज मोहम्मद रशीद मोहम्मद ( वय ४१ रा – मुस्लिम कॉलनी ) हा विना परवाना कल्याण मटका नावाचा सट्टा जुगाराचा आकड्यांवर लोकांकडून पैसे स्विकारत सट्टा जुगाराचे खेळ खेळतांना व खेळवितांना दुपारी मिळून आला म्हणून पोकॉ संजय बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकला आरोपीकडून सट्टा जुगार खेळण्याचे साहित्य तीन हजार रुपये किंमतीचा एम.आय.कंपनीचा मोबाईल,एक हजार रुपयांचा मोबाईल,शंभर रुपयांचे कँल्क्युरेटर,तीस हजार रुपयांची जुनी रिक्षा ( क्र एम.एच-१९ व्ही.०१६१ ) तसेच ४६,९७० रोख रक्कम असे एकूण ८१,०७० चा मुद्देमाल मिळून आला म्हणून शहर पोलीस स्टेशनला गुरुन ४७४/२०२० कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.या गुन्ह्यात मालकाला आरोपी करणे गरजेचे होते पण गुन्ह्यात मालकाचा उल्लेख कुठेही केलेला नसल्याने चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यात आल्याचे प्रकार दिसत असून मालकाचे नाव वगळण्यात आले आहे

Protected Content