विषारी औषध घेतलेल्या तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील तरुणाने बुधवारी २४ एप्रिल रोजी पहाटे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणाचा जळगावात उपचार सुरु असताना रात्री ८.३० वाजता सुमारास मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोपान किसन खिरोडकर (वय ४०, रा. वढोदा ता. मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो वढोदा येथे आई, वडील, पत्नी, २ मुले यांच्यासह राहतो. मोलमजुरी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. बुधवारी दि. २४ एप्रिल रोजी पहाटे १२ ते १ वाजेच्या दरम्यान त्याने कुठल्यातरी नैराश्यात येऊन विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी सोपान याला उपचारासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केले होते.

दरम्यान, उपचार सुरु असताना संध्याकाळी साडे आठ वाजता सोपान खिरोडकर यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. गुरुवारी शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content