जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात ११ लोकसभेच्या मतदारसंघासाठी मतदान झाले आणि चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी ५२ टक्क्यांवर मतदान झाले. यामध्ये नंदूरबारमध्ये सर्वाधिक तर शिरूरमध्ये सर्वात कमी मतदान झाले.
नंदूरबारमध्ये 60.60 टक्के, पुण्यात 44.90 टक्के, शिरुरमध्ये 43.89 टक्के, मावळमध्ये 46.03 टक्के, जालन्यात 59.44 टक्के, संभाजीनगरमध्ये 54.02 टक्के, बीडमध्ये 58.37 टक्के, रावेरमध्ये 63.1 टक्के, शिर्डीत 55.27 टक्के, अहमदनगरमध्ये 53.27 टक्के, जळगावात 57.7 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात आता शेवटचा पाचवा टप्पा बाकी आहे. पाचव्या टप्प्यासाठी 20 तारखेला मतदान आहे. ज्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणेसह मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश आहे.