आसोदा गावात सोशल मिडीयावर धार्मीक भावना दुखावल्या प्रकरणी तालुका पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील आसोदा गावातील चार तरूणांनी सोशल मिडीयावर धार्मीक भावना दुखवणारी पोस्ट टाकल्याची घटना उघडकीला आले होते. याप्रकरणी चौकशी अंती मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता  जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आसोदा येथील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील आसोदा गावातील चार जणांनी सोशल मिडीयावरील इस्टाग्रामवर एका धर्माच्या महापुरूषाचे फोटो चिटकावून त्याचा चित्राला आग लावण्यात आल्याचे छायाचित्र असलेली पोस्ट टाकले होते.  या फोटोमध्ये आसोदा गावातील चार जणांच फोटो देखील होते. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याचे २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आले. यामुळे एका धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने धार्मीक भावना दुखावल्या जात असल्याचे लक्षात आल्यानंतर एका प्रौढ व्यक्तीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहे.

Protected Content