चोरीच्या ५ दुचाकींसह दोन चोरट्यांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरीच्या ५ दुचाकींसह दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी २८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन सुरेश सपकाळे (वय-२३) रा. मालोद ता.यावल आणि अजीमउद्दीन नजीमउद्दीन (वय-३०) रा. चित्रा टॉकीज, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश असे दोन्ही संशयित आरोपींची नावे आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७७३/२२ नुसार दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विकास सातदिवे यांच्याकडे होता. एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दुचाकी चोरट्यांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नितीन सुरेश सपकाळे आणि अजीमउद्दीन नसीरउद्दीन या दोघांना वेगवेगळ्या भागातून पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या संदर्भात शनिवारी २८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता दोनही संशयित आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, किरण पाटील यांनी कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

 

Protected Content