लग्न करण्यासाठी विवाहितेला करत होता ब्लॅकमेलींग !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिच्याच विवाहित मैत्रिणीला वारंवार मोबाईलवर फोन करून ब्लॅकमेलींग करून लग्न करण्याची मागणी करत धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शनिवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र सुभाष पाटील (पुर्ण पत्ता माहित नाही) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की] जळगाव शहरातील एका भागात २१ वर्षीय विवाहित महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कामाच्या ठिकाणी ओळख असलेल्या एका मैत्रिणीने पती जितेंद्र पाटील यांच्या घटस्फोट घेतलेला आहे. हे विवाहित महिलेला माहित नव्हते. त्यामुळे जितेंद्र पाटील याने विवाहित महिलेशची ओळख निर्माण करून मोबाईलनंबर घेतला. पत्नीशी बोलायचे आहे असं सांगून वारंवार फोन करत होता. त्यानंतर मैत्रिणीचा आणि जितेंद्र पाटील यांचा घटस्फोट झाल्याचे विवाहित महिलेला समजले. त्यानंतर महिलेने मला कॉल करू नको, असे जितेंद्र पाटील याला समजावून सांगितले. परंतु याला न जुमानता जितेंद्र पाटील हा वारंवार विवाहित महिलेला फोनवर बोलण्यासाठी धमकी देत होता. त्यानंतर माझ्याशी लग्न करण्याची मागणी केली. लग्न केले नाही तर मी तुझा संसार मोडून टाकेल, तुझ्याबद्दल तुझ्या पतीला बरे वाईट सांगून गैरसमज पसरवून टाकेल, अशी धमकी देवून ब्लॅकमेलींग करून लागला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने शनिवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव जितेंद्र पाटील यांच्या विरोधात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जितेंद्र पाटील यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content