जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुवर्णनगरी म्हणून ओळख आलेल्या जळगाव जिल्ह्यात सध्या सोन्याच्या पाठोपाठा चांदीच्या भाव तेजीत असल्याचे दिसून आले. सात दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावात गेल्या आठवड्यात वाढल्यानंतर घसरलेले सोने, चांदीचे दर पुन्हा वाढत आहेत. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोने ३०० रुपये तोळा तर चांदी किलोमागे २ हजार रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले.
सोन्याची आणि चांदीची दरवाढ ही इस्त्राइलने केलेल्या बॉम्बहल्ल्याचे पडसाद असल्याचे बोलले जात आहे. पुढील काही दिवसांमध्ये अजूनही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी सोन्याचे प्रतितोळ्याचे दर ७४९०० (जीएसटीसह ७७१४७) तर चांदी ९२ हजार रुपये किलोवर गेली होती. मात्र, त्यानंतर घसरून सोमवारी चांदी ९१ हजार तर सोने ७२४०० रुपये तोळा झाले होते. मंगळवारी चांदी ९३ हजार (जीएसटीसह ९५७९०) रुपये किलो तर सोने ७२७०० रुपये तोळा झाले. ही दरवाढ इस्त्राइल हल्ल्याचा परिणाम असल्याचे चांदीचे घाऊक व्यापारी यांनी सांगितले.