Home क्राईम ओला कॅबचालकाकडून महिलेचा विनयभंग; अखेर पोलिसांनी केली अटक

ओला कॅबचालकाकडून महिलेचा विनयभंग; अखेर पोलिसांनी केली अटक

0
68


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रवासी महिलेचा विनयभंग करून फरार झालेल्या ओला कॅब चालकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. तसेच त्याची कॅब जप्त करण्यात आली आहे. राहुल पांडुरंग म्हस्के असे अटक केलेल्या कॅब चालकाचे नाव आहे. फिर्यादी महिलेला कोरेगाव पार्कला मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता जायचे होते. त्यासाठी त्यांनी आरोपी राहुल याची एम.एच १४ एल.बी ४१३३ या क्रमांकाची कॅब बुक केली. राहुल याने कॅब कोरेगाव पार्कच्या दिशेने नेली नाही.

उलट दिशेने देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणली. फिर्याद दिली आहे. महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन मोटारीतच विनयभंग केला. याबाबत एका महिलेने १४ मे रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी राहुल हा ओळख लपवून वावरत होता. संपूर्ण पत्ता माहिती नसताना देहूरोड पोलिसांनी आरोपी राहुल याला अटक केली. गुन्ह्यातील कॅब जप्त करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound