चाळीसगाव, प्रतिनिधी | येथे केंद्र सरकारने लागू केलेला सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
यावेळी भारत माता की जय, वंदेमातरम् च्या घोषणा देण्यात आल्या. रॅलीत तिरंगा ध्वजासह भगवे ध्वज सहभागींनी हातात घेतले होते. तसेच त्यांनी खून भी देंगे, जवानी भी देंगे, देश की मिट्टी कभी नही देंगे, यासह विविध घोषणांचे फलक हातात घेतले होते. रॅलीच्या समारोपाप्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांनी एनआरसी व सीएए संदर्भात माहिती देऊन या कायद्यांविरोधात अल्पसंख्याक यांना चुकीच्या पद्धतीने भडकवले जात असल्याचे सांगितले. हा कायदा सर्वाना लाभदायक असल्याचे मत खासदार पाटील यांनी मांडले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, सी.ए.ए. व एन.आर.सी. संदर्भात गैरसमज पसरविले जात असल्याचे आरोप केला. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही ठराविक पक्ष प्रयत्न करीत असल्याचे सांगून या कायद्यात प्रथमच सुधारणा न होता ती पाचव्यांदा होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पाकिस्तान, अफगाणिस्तान या मुस्लिम बहुल राष्ट्रात तेथे हिंदुंवर कायम अत्याचार होत असतात असे सांगितले.