चाळीसगावात नकली तंबाखूचे उत्पादन; लाखोंचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील पिरमुसा कादरीनगरात मे. एच.एच. पटेल कंपनीचे सुर्य छाप टोटा या ब्रॅण्डची नकली तंबाखू अवैधरीत्या विकल्या जात असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली असून पोलीसांनी छापा टाकून  १ लाख २० हजारांचे मुद्देमाल जप्त करून दोन जणांवर कारवाई केली आहे.   

सविस्तर वृत्त असे की, मे. एच.एच. पटेल कंपनीत सुर्य छाप टोटा या ब्रॅण्ड नावाने तंबाखू उत्पादन करण्यात‌ येत असून दोन कारखाने एक नागद रोडवर व दुसरा कन्नड रोडवरती आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून नकली सुर्य छाप टोटा या ब्रॅण्ड नावाने निकृष्ट दर्जाचे तंबाखू उत्पादन करून सर्रासपणे विक्री होत असल्याचे संशय कंपनीचे व्यवस्थापक नवीन परमानंद हरीयाणी यांना आली. यावर त्यांनी अधिक माहिती घेतली असता शहरातील पिरमुसा कादरीनगर, त्रिमूर्ती बेकरीजवळ  बेकायदेशीरपणे नकली तंबाखू कंपनीच्या नावाने उत्पादन करून सर्रासपणे विक्री होत असल्याचे कळताच त्यांनी याबाबत शहर पोलिसात तक्रार दाखल केली. 

त्यावर सपोनि नि.अ.सैय्यद, दिपक पाटील, निलेश पाटील व अमोल पाटील यांनी सदर ठिकाणी रात्री १:३० वाजेच्या सुमारास छापा टाकला असता १,२०,००० हजार रुपये किंमतीचे १२ गोण्या मिळून आले. २०० रूपये प्रमाणे एकूण ६०० नग पुढे मिळून आले. एकूण १,२०,००० हजार रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले आहे. यावेळी इरफान अक्रमबेग मिर्झा (वय-३८) व रिजवान शेख नजीर (वय-२३) दोघेही रा. पिरमुसा कादरीनगर, त्रिमूर्ती बेकरीजवळ ता. चाळीसगाव यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

व्यवस्थापक नवीन परमानंद हरीयाणी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ४२०,२६२,२७३,४८६,४८७,४८८ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि नि.अ.सैय्यद हे करीत आहेत.

Protected Content