अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील मांडळ येथे १० रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास एकाच वेळी वेगवेगळ्या सात ठिकाणी चोरांनी दुकाने व घरफोडी केल्याची घटना उघडकीला आली असून मारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात महेश जैन किराणा दुकानातून अंदाजित २५ ते ३० हजार रुपये तर निलेश पाटिल कृषी केद्रं चे कुलूप तोडून लँपटॉप, कॅश ३० हजार व वाल्मिक पाटिल रेशन दुकानदार यांच्या गोदामातून ज्वारी गोणी, दोन ते तीन हजार कॅश तसेच
अमोल सोनार यांच्या दत्तात्रय ज्वेलर्स या दुकानातून ४०० ग्रँम चांदी तर 16 ग्राम सोने इतर दोन हजार रोख तर कमलाकर आहिरराव यांच्या ज्वेलर्स दुकानातून सहा सात हजार रोख चोरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनास्थळी मारवड पोलीस ठाण्याचे पीएसआय विनोद पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
दरम्यान वावडे येथून त्याच रात्री बोरेलो गाडी चोरीस गेल्याची चर्चा असून यांचं गाडीतून मांडळ गावात प्रवेश करीत दुकाने व घरफोडी केली असावी असा अंदाज गावकऱ्यांमधून चर्चिले जात आहे.