Home क्राईम शेतकऱ्याला मारहाण करून मोबाईल लांबविला

शेतकऱ्याला मारहाण करून मोबाईल लांबविला

0
29

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सांगवी खुर्द शिवारात रस्त्यावर शेतकऱ्याला दोन जणांनी मारहाण करून खिशातील महागडा मोबाईल घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत यावर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील निवृत्ती चौधरी वय 47 रा. अट्रावल तालुका यावल हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवार २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सांगवी खुर्द शिवारात त्यांच्या शेतात काम करत असताना अज्ञात दोन तरुण त्या ठिकाणी आले. येऊन काही कारण नसताना त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरी हिसकावून घेतले व सोबत मोटरसायकलची चावी देखील घेऊन पळून गेले. या संदर्भात सुनील चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.


Protected Content

Play sound