वन कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा – कास्ट्राईबची मागणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल पूर्व वन क्षेत्रातील जंगलात कर्तव्यावर असलेल्या वनधिकारी,  कर्मचारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,   यावल पूर्व वन क्षेत्रातील डोंगर पठोरा परिमंडळातील पेंझरीपाडा कक्ष क्रमांक ८० मध्ये सकाळी जंगलात वनसंपतीचे रक्षणासाठी गेलेले वनक्षेत्रपाल  व्ही. टी. पदमोर तसेच वनरक्षक गोवर्धन डोंगरे,  जीवन नागरगोजे,  कृष्णा शेळके व वन मजूर आदी  पथकासह कंम्पारमेंट ८० मध्ये सकाळी जंगल तपासणी अतिक्रमण, वृक्ष तोडीची पाहणी करीत होते. या वेळी याचा  संशयीत आरोपींना सुगावा लागल्याने सर्व वनकर्मचारी अधिकारी बेसावध असल्याचे पाहूण संशयित आरोपी यांनी वन अधिकारी ,कर्मचारी यांचेवर त्यांचे कडील शास्त्राने व लाठीकाठीने हल्ला करून जखमी केले आहे. यानंतर संशयित आरोपी फरार झालेले आहे.  या हल्ल्यात जीवन नागरगोजे,  वनरक्षक कृष्णा शेळके, वनरक्षक गोवर्धन डोंगरे वनरक्षक यांचेवर प्राण  घातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जीवन नागरगोजे वनरक्षक यांचा पाय फ्रैक्चर झाला आहे व  गोवर्धन डोंगरे यांचे डोक्यास जबर मार लागलेला आहे. यावल व चोपडा हा जंगलाचा अतिसंवेदनशील भाग आहे. वन कर्मचारी अधिकारी यांचे रात्रंदिवस कर्तव्य असल्याने वनकर्मचारी आपल्या जीवाची पर्वा नकरता जंगल संपत्ती, वृक्षतोड, चोरटी लुट  आदी संपत्तीचे रक्षण करीत असतांना त्याच्यावर सतत असे हल्ले होत राहिल्यास व आरोपींवर कठोर कारवाई न केल्यास वन कर्मचाऱ्यांचे मनोबल खञ्चीकरण होवून  त्यांचे कार्त्यव्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  संशयित आरोपी यांना तात्काळ अटक करून लोक सेवकाला ( वनकर्मचारी) त्यांचे कर्तव्यापासून प्रतिबंधित करणे, धाक दडपशाही करणे इ. नुसार भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५३ अन्वये अजमीन पात्र गुन्हा नोंदवून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करनेत यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर  कास्ट्राईब वन कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे,  कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे यांच्यासह आदींची स्वाक्षरी आहे.

 

Protected Content